Posts

Showing posts from June, 2020

जमीन पावन भारतातली, ही आमुची आई...

Image
Quarantine काळात जाम bore होत yarr... सहजच खिडकीत डोकं टेकावलं आणि मनात विचार येऊन गेला की खुप पुढे चाललाय का आपला देश?  मग या तरुण पिढीने खुप काही करायची गरज नाही का?.. अरे अरे ! चुकलंच जरा, आपल्याला तर खुप काही करायचय... खुप असे विषय आहेत की आपली पिढी ते करू शकते.  उदाहरणार्थ :       काय आहे हे जाती, धर्म? तुम्हाला माहित आहे का? कोणी काढल्या या अशा संकल्पना? असो, पण आत्ता सध्या जे सुरु आहे ते योग्य की अयोग्य? हिंदू , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध हे सगळे वेगवेगळे धर्म आहेत. अरे, पण आपण सगळे माणसंच आहोत ना मग कशाला हव्या जाती आणि धर्म....     माणुसकी हाच एक धर्म मानावा आणि सरळ चालत राहावं. नको त्या कुरघोडी कशाला?  हे धर्म आणि जातीवाद आत्ताच्या पिढीने तरी थांबवले पाहिजेत.आपण सुशिक्षित होतो पण फक्त पुस्तकी बरका !      हे धर्म, जाती बदलणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. या कायम राहतील पण यामध्ये ही आपण सुधारणा आणू शकतो.  ते कसं... धर्म जरी वेगळा असला, खाण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या किंवा पोशाख वेगळे असले म्हणुन माणूस माणसापासू...

आयष्यावर बोलू जरा..

Image
    आयुष्य खुप सुंदर आहे पण ते तुम्ही कस जगता यावर अवलंबून आहे. माझ्या मते तरी आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुम्हीच विचार करा की आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय केलंय....     आपण आज आहोत,  उद्या नाही. प्रत्येकाची expiry date लिहून ठेवली आहे आणि ती आपल्याला माहित नसते म्हणूनच मी म्हणते की, आपल्या आयुष्यात आपल्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या कराव्यात. Saturday night पेक्षा आणि धांगड धिंगाण्यापेक्षा आपले छंद जोपासलेले काय वाईट. आजकाल weekend च्या खुप बातम्या येतात. दारू पिऊन झाले अपघातात,  एव्हढे-एव्हढे ठार किंवा गंभीर जखमी, काय आहे हे. हे छंद नाही मूर्खपणा आहे आणि या मुर्खपणामुळे आपण आयुष्य गमावतो ते ही कुठलाही विचार न करता अगदी आई-वडिलांचा देखील.      क्षितिजापल्याड विचार केला तर, पुन्हा एक प्रश्न उभा राहील जो मलाही शंभर वेळा मनात येऊन गेला तो म्हणजे लोक काय म्हणतील?   पण खरं सांगू का, काही गोष्टी या समाजाचं भान ठेऊन करायला हव्यात. एकदम बिनधास्त राहून नाही जमतं. हा.. पण, मी असंही नाही म्हणत की तुम्ही फक...