माझ्या आयुष्यातली एक गंमत
कधी imagine केलंय का...दुसरी तिसरी नंतर ताटातूट झालेलं मित्र अचानक 10-12 वर्षांनी भेटले तर.... फार वेगळं असतं बालपण आणि त्या आठवणी. त्यामध्ये निरागसपणा असतो. आणि ते मित्र पण वेगळेच असतात. कितीही वर्षांनी भेटलो तरीही त्यांच्यावरचा हक्क तितकाच; infact अजून वाढलेला असतो. नुसत्या खोड्या आणि तेव्हडंच प्रेम सुद्धा असतं. लहानपण किती छान असतं हे आज समजतंय पण हा माझं आणि माझ्या मित्रांची वय वाढली असली तरी आम्हाला त्या जागेवरून कोणीही बाजूला करू शकत नाही. आम्ही एकमेकांसाठी नेहमीच लहान आहोत. अचानक भेटल्यावर फार गमतीजमती झाल्या. खरं तर आम्ही सगळे online भेटलो. Thanks for social media. मग group केला आणि त्यावर सगळे बोलायला लागलो. खुप आठवणी बाहेर पडल्या. आम्ही सगळे तर त्या वर्गात बसून गोंधळ घालतोय असंच वाटलं क्षणभर. खुप मज्जा. काही जण आठवत नव्हते काही जण अगदीच हृदयाजवळ कधी ही न विसरणारे. Group वर hii मेसेज टाकला कि काही जण कसा आहे, कशी आहे तर काही जण कोण तू ? एकमेकांची खेचणे हे तर aim च आमचं. असेच दिवस सुरु आहेत जुन्या आठवणीत दररोज रमत आहे. आमची मैत्री अशीच राहणार ...