Posts

अशी ही एक सकाळ

Image
          Alarm वाजला आणि जाग आली. किचन मधून काहीसा आवाज येत असूनही तो दुर्लक्ष करून मी फ्रेश झाले. अर्थातच किचनमध्ये आईच असणार. तेवढ्यात तिने हाक मारली आणि कॉफीचा गच्च भरलेला कप हातामध्ये ठेवला आणि तिच्या त्या गोड, सुंदर प्रसन्न चेहऱ्याने  मला म्हणाली "Gooood morningg बाळ". थँक्यू म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणाले ( स्मित हास्य करत ) " अशीच सकाळ मला रोज हवी आहे". आईने डोक्यावरून हात फिरवला; तिने सुद्धा स्मित हास्य दिलं.            मी जिना चढून अर्थात तो कॉफीचा मग सांभाळत हळूच गच्चीवर पोहोचले. गरमागरम कॉफीचा मग, मी आणि सुंदर सकाळ. हाच विचार करत असताना गार वाऱ्याची मंद, हळूवार; केसांना व गालांना जणू हलकासा स्पर्श करणारी ती झुळूक आली आणि मीही ती डोळे मिटून अनुभवली. सुख काय असतं तर हेच असं त्या क्षणी वाटलं. सोबत झाडांच्या पानांचा आवाज येतोय त्यात पक्षांचा किलबिलाट आणि चिमण्यांची चिव चिव तर जास्तच ऐकू येतेय. अशा या आवाजांच्या स्पर्धेमध्ये पूर्वेकडे पाहिलं ; हलकासा तांबडा रंग, अगदी मनाला शांत करणारा आणि तितकाच प्रोत्साहित करणारा सुद्धा. ...

एकटं पाखरू

तू दूर केलास खरं या पाखराला पण हे तुझं पाखरू पुन्हा आपल्या घरट्यात येऊ पाहतय जिथे आता आपलं कोणी राहिलच नाही भिरभिरलं ते जरी घरटं निशब्ध आहे हे वेड पाखरू ही आता शांत आहे तू दूर केलंस गं त्याला आता शिकेलही ते पुन्हा उडायला तुझ्या सोबतीने त्याला उडायचं आहे गं नको गं असं दूर करुस या एकट्या पाखराला.                                            - श्वेता जगदाळे

प्रेम

मी सरता, तु उरता  मागे दरवळ असावा,   मी शिंपलेला...तु जपलेला... तो आठवांचा बहर असावा !                             - श्वेता जगदाळे 

Peace

Image
 Mental peace in my pov. It doesn't have to be in a place with no noise, no trouble or hard work... On rough days it calms your heart and being at peace means being in control of your emotions.  How do I find peace of mind everyday? For me peace is not about avoiding people and sitting alone in a silent place.  For me peace is in finding happiness in little things, in meditation, spending time in nature, keeping a journal, sometimes going on self dates, being a grateful person, taking responsibility for my actions, loving myself, soaking in the morning sunshine or getting lost in the sunsets, and telling myself that they are the rays of hope, and having sweet conversations with my Aai. I look back two years and realise how different I am today. I found my peace <3 Happy Mind. Happy Soul. Happy Shwey!

Nurse

Image
What is nurse? खुप simple आहे बोलायला Nurse. कुठलं career करते असं कोणी विचारलं आणि आपण जर सांगितलं की nursing,  तर लोकांची तोंड वाकडी होतात आणि यावरूनच त्यांच अज्ञान समजतं. Nursing is a professional course. Nurse मध्ये ज्या qualities आहेत त्या इतर कुठल्या ही course मध्ये नाहीत. तिला strong असावं लागतं, तिला patients ची care पण करावी लागते. प्रत्येक गोष्ट तपासूनच (cross check) करूनच पाहावी लागते.आणि भरपूर गोष्टी. Nurses ला machines शी नाही तर माणसांशी,माणसांसोबत आणि माणसांसाठी काम करायचं असतं. ती पेशन्ट आणि डॉक्टर मधला दुवा आहे. दोघांचं म्हणणं तिलाच ऐकाचं असतं, patient च्या family ला सुद्धा तीच धीर देते. She can do anything like giving care to the patients, she have the communication skill, the most important thing is she have stamina, sense of humor, time management and more. स्वतः च्या आयुष्यात कितीही दुःख असलं तरी ती सतत smile करत राहते.  खरं तर हा tough job आहे. Long time duty, emergency cases आणि कधी night duty सुद्धा असते. तरीही त्या सतत काम करत राहतात. काही ...

माझ्या आयुष्यातली एक गंमत

Image
कधी imagine केलंय का...दुसरी तिसरी नंतर ताटातूट झालेलं मित्र अचानक 10-12 वर्षांनी भेटले तर.... फार वेगळं असतं बालपण आणि त्या आठवणी. त्यामध्ये निरागसपणा असतो. आणि ते मित्र पण वेगळेच असतात. कितीही वर्षांनी भेटलो तरीही त्यांच्यावरचा हक्क तितकाच; infact अजून वाढलेला असतो. नुसत्या खोड्या आणि तेव्हडंच प्रेम सुद्धा असतं. लहानपण किती छान असतं हे आज समजतंय पण हा माझं आणि माझ्या मित्रांची वय वाढली असली तरी आम्हाला त्या जागेवरून कोणीही बाजूला करू शकत नाही. आम्ही एकमेकांसाठी नेहमीच लहान आहोत.  अचानक भेटल्यावर फार गमतीजमती झाल्या. खरं तर आम्ही सगळे online भेटलो. Thanks for social media. मग group केला आणि त्यावर सगळे बोलायला लागलो. खुप आठवणी बाहेर पडल्या. आम्ही सगळे तर त्या वर्गात बसून गोंधळ घालतोय असंच वाटलं क्षणभर. खुप मज्जा. काही जण आठवत नव्हते काही जण अगदीच हृदयाजवळ कधी ही न विसरणारे. Group वर hii मेसेज टाकला कि काही जण कसा आहे,  कशी आहे तर काही जण कोण तू ?   एकमेकांची खेचणे हे तर aim च आमचं. असेच दिवस सुरु आहेत जुन्या आठवणीत दररोज रमत आहे. आमची मैत्री अशीच राहणार ...

ती

Image
बाई ला किंवा स्त्री जातीला समजायचं खुप अवघड आहे असं म्हणलं जातं. पण खरं तर खुप सोपं आहे तिला ओळखायला.  ती... रुसतेय, भांडतेय, अपेक्षा ठेवतेय, हक्क गाजवतेय, भरभरून बोलतेय तोवर तुमची आहे.  हे सर्व संपून ती जेव्हा फक्त फसवं हसेल अन व्यक्त व्हायचं टाळेल विश्वास ठेवा तुम्ही तिला गमवलंत.  इतकी सोपी असते ती समजायला.