जमीन पावन भारतातली, ही आमुची आई...
Quarantine काळात जाम bore होत yarr... सहजच खिडकीत डोकं टेकावलं आणि मनात विचार येऊन गेला की खुप पुढे चाललाय का आपला देश? मग या तरुण पिढीने खुप काही करायची गरज नाही का?.. अरे अरे ! चुकलंच जरा, आपल्याला तर खुप काही करायचय... खुप असे विषय आहेत की आपली पिढी ते करू शकते.
उदाहरणार्थ :
काय आहे हे जाती, धर्म? तुम्हाला माहित आहे का? कोणी काढल्या या अशा संकल्पना? असो, पण आत्ता सध्या जे सुरु आहे ते योग्य की अयोग्य? हिंदू , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध हे सगळे वेगवेगळे धर्म आहेत. अरे, पण आपण सगळे माणसंच आहोत ना मग कशाला हव्या जाती आणि धर्म....
माणुसकी हाच एक धर्म मानावा आणि सरळ चालत राहावं. नको त्या कुरघोडी कशाला? हे धर्म आणि जातीवाद आत्ताच्या पिढीने तरी थांबवले पाहिजेत.आपण सुशिक्षित होतो पण फक्त पुस्तकी बरका !
हे धर्म, जाती बदलणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. या कायम राहतील पण यामध्ये ही आपण सुधारणा आणू शकतो. ते कसं... धर्म जरी वेगळा असला, खाण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या किंवा पोशाख वेगळे असले म्हणुन माणूस माणसापासून दूर जात नाही. एकमेकांना मदत करावी, दुसऱ्यांच्या चुका काढण्यापेक्षा जरा स्वतः कडे लक्ष द्यावं, हा रंग तो रंग कशाला? सगळं काही निसर्गानेच दिलंय ना मग वाटून कशाला घ्यायचे रंग? आता हेच बघा की, 'रमजान' मध्ये 'राम' आणि 'दिवाळी' मध्ये 'अली' आहेच. इथेच दिसते की एकता पण मनातुन पण काहीतरी वाटायला हवं एवढंच.तशी आजची तरुण पिढी या गोष्टी, जाती,धर्म बाजूला सारून चालायला लागलीय. प्रगती होतेय.
आज जर सगळे एकत्र आले तर खुप गोष्टी अशा घडतील ज्या कधी ही नाही घडल्या. आपला भारत (हिंदुस्थान) एक वेगळा देश असेल जिथे अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक देव, पण भेदभाव नाही, सगळं काही सुरळीत...सध्या प्रगतीच्या मार्गाने चालला आहे आपला देश फक्त तरुण पिढी ने त्याला पाठिंबा द्यायला हवा हिच इच्छा !
हुश्श ! बरंच काही सुचलं मला... चला उठावं म्हणते आता खुप वेळ झालं खिडकीतच बसले. कामं आहेत. तुम्ही पण सध्या आईला मदत करत जा, बरं वाटेल तिलाही....
😍😅😂
ReplyDeleteखूप छान 🙌🏻🙌🏻😍
ReplyDeleteMast 🥰👍👌
ReplyDeleteChhan🥰
ReplyDelete😍😍NYC...
ReplyDelete