आयष्यावर बोलू जरा..

    आयुष्य खुप सुंदर आहे पण ते तुम्ही कस जगता यावर अवलंबून आहे. माझ्या मते तरी आपण आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुम्हीच विचार करा की आपण आपल्या आयुष्यात नेमकं काय केलंय....
    आपण आज आहोत,  उद्या नाही. प्रत्येकाची expiry date लिहून ठेवली आहे आणि ती आपल्याला माहित नसते म्हणूनच मी म्हणते की, आपल्या आयुष्यात आपल्याला जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या कराव्यात. Saturday night पेक्षा आणि धांगड धिंगाण्यापेक्षा आपले छंद जोपासलेले काय वाईट. आजकाल weekend च्या खुप बातम्या येतात. दारू पिऊन झाले अपघातात,  एव्हढे-एव्हढे ठार किंवा गंभीर जखमी, काय आहे हे. हे छंद नाही मूर्खपणा आहे आणि या मुर्खपणामुळे आपण आयुष्य गमावतो ते ही कुठलाही विचार न करता अगदी आई-वडिलांचा देखील. 
    क्षितिजापल्याड विचार केला तर, पुन्हा एक प्रश्न उभा राहील जो मलाही शंभर वेळा मनात येऊन गेला तो म्हणजे लोक काय म्हणतील?  पण खरं सांगू का, काही गोष्टी या समाजाचं भान ठेऊन करायला हव्यात. एकदम बिनधास्त राहून नाही जमतं. हा.. पण, मी असंही नाही म्हणत की तुम्ही फक्त society चंच ऐकावं. अजिबात नाही. तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही करा. तुमच्या आवडी-निवडी जपा.एव्हढंच असतं खरं आयुष्य.
    Past हा आपला अनुभव आहे एव्हढंच लक्षात ठेवायाला हवं आणि जे सध्या सुरु आहे ते आनंदाने जगायचं.  Past मध्ये ज्या चुका झाल्या त्या परत होणार नाही एव्हढाच काय तो भूतकाळ ! भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करावी पण त्यातही imagination नको. ज्या गोष्टी घडणार नाहीत त्यावर तासंतास imagine करून काय फायदा. 
    आयुष्याला critical नाही बनवायचं. कारण कधी कधी आपण न ठरवता सुद्धा आपल्या आयुष्यात वेगवेगळी संकटे येतात आणि आपण त्याला लढा पण देतो. हा! पण कधीही हार नाही मानायची,  खुप जण असे असतात जे आपल्यावर खुप प्रेम करतात त्यांच्यासाठी तरी जगायला हवं काय माहित कदाचित पुढे खुप छान असेल आपलं आयुष्य ! जगण्याची आशा ठेऊन जगलं पाहिजे. माणूस म्हणुन आलोय जन्माला तर त्याचा फायदा ही घेऊयात ना!  नेहमी आपल्या माणसांना वेळ दिला त्यांना आपल्या मनातलं सांगितलं की आयुष्य खुप सोप्प आहे. अडचणी तर येतच राहतात,  Face करायला शिकून पुढे जायचं एवढच ध्यानात ठेऊ. 
शेवटी एव्हढच की, जगा पण हार कधीच मानु नका.  
                                                                    ~श्वेता जगदाळे 
                                                                 

Comments

  1. मस्त छान विचार मांडलेत. सध्याच्या पिढीला मार्गदर्शक

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. सध्याच्या पिढीसाठी सुद्धा पण सर्वांसाठीच लिहिण्याचा एक प्रयत्न.

      Delete
  2. खूप छान श्वेता❤keep going😘

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख 👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान आहे..!!😍😍

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर विचार 👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अशी ही एक सकाळ